सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: सोमवार, 25 फेब्रुवारी 2019 (14:57 IST)

सॅमसंगचा एस 10 प्लस मोबाइल 8 मार्चपासून भारतात उपलब्ध

सॅमसंगच्या प्रिमियम 'एस सीरीझ'चा नवीन स्मार्टफोन एस 10 प्लस लवकरच भारतीय बाजारात येणार आहे. तथापि, याची किंमत 1.18 लाख रुपये ठेवली गेली आहे. सॅमसंग एस 10 प्लसची विक्री भारतात 8 मार्चपासून होणार आहे. 
 
जायंट स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने 20 फेब्रुवारी रोजी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये तीन मॉडेल - गॅलॅक्सी एस 10 प्लस, गॅलॅक्सी एस 10 आणि गॅलॅक्सी एस 10 ई सादर केले होते. सॅमसंगचे हे स्मार्टफोन ऍपलशी स्पर्धा करतील. सॅमसंगने वक्तव्यात सांगितले की गॅलॅक्सी एस 10 प्लस 1 टीबी (टेराबाइट), 512 जीबी आणि 128 जीबी या तीन स्टोरेज क्षमतेत उपलब्ध होईल. त्यांची किंमत अनुक्रमे 1,17,900 रुपये, 91,900 रुपये आणि 73,900 रुपये असेल. कंपनी म्हणाली की, या नवीन फोनमध्ये सिनेमॅटिक इन्फिनिटी - ओ डिस्प्ले, चांगले कॅमेरा आणि डिस्प्लेमध्ये फिंगर प्रिंट स्कॅनर सारख्या सर्व वैशिष्ट्ये आहे. 
 
सॅमसंगने हे सांगितले की गॅलॅक्सी एस 10 स्मार्टफोन 512 जीबी मॉडेल (84,900 रुपये) आणि 128 जीबी मॉडेल (66,900 रुपये) किमतीत येईल. त्याच वेळी, एस 10 ई केवळ 128 जीबी स्टोरेजसह येईल आणि त्याची किंमत 55,900 रुपये असेल. भारतातील प्रिमियम स्मार्टफोन मार्केटमध्ये (30,000 रुपयांपेक्षा जास्त) 2018 मध्ये 8 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. या श्रेणीमध्ये 34 टक्के बाजार शेअरसह सॅमसंग टॉपवर आहे. या वर्गात चीनची कंपनी वनप्लस त्याला कठीण स्पर्धा देत आहे. डिसेंबर तिमाहीत 36 टक्के बाजार शेअरसह वनप्लस टॉपवर राहिले. 2018 मध्ये त्यांचा बाजार हिस्सा 33 टक्के होता. प्रिमियम स्मार्टफोन श्रेणीमध्ये ऍपलचा हिस्सा 23 टक्के आहे.