बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: शनिवार, 23 फेब्रुवारी 2019 (11:10 IST)

Oppo F11 Pro 5 मार्चला भारतात होणार लॉचं

येणार्‍या 5 मार्चला Oppo आपला नवीन स्मार्टफोन Oppo F11 Pro लॉचं करणार आहे. लक्षात घेण्यासारखे म्हणजे चिनी कंपनी Oppo या फोनचा टीझर जवळजवळ एक आठवड्यापासून जारी करीत आहे. कंपनीने आधीच माहिती दिली होती की Oppo F11 Pro मध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेरा, 48 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि 3 डी ग्रेडियंट कव्हर राहील.
 
Oppo वेबसाइटनुसार, हे स्मार्टफोन कमी प्रकाशात उत्तम पोर्ट्रेट फोटोग्राफी करण्यात सक्षम आहे. या व्यतिरिक्त, मागील भागावर ड्युअल कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅश देण्यात येईल. कॅमेरा सेटअपमध्ये 48 मेगापिक्सेल सेन्सरला जागा मिळाली आहे. Oppo मते, एआयच्या सहाय्याने हे क्वालिटी फोटो काढेल. याच्याबरोबर 5
मेगापिक्सेल सेन्सर काम करेल. स्मार्टफोनमध्ये फ्रंट पॅनलवर पॉप-अप सेल्फी कॅमेरा असेल.
 
कंपनीने सांगितले की हे फोन एन्हांस्ड लो लाइट फोटोग्राफीसाठी सुपर नाइट मोडसह येईल. तसेच ते 3 डी ग्रेडियंट कॅसिंगसह येईल. कंपनीने जारी केलेल्या टीझर फोटोने रीयर फिंगरप्रिंट सेन्सरचीदेखील पुष्टी केली आहे. सध्या इतर स्मार्टफोन वैशिष्ट्यांविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही झाली आहे.