सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019 (12:42 IST)

लंबोरगिनी हुराकेन ईवो लॉन्च, जाणून घ्या किंमत

लंबोरगिनीने भारतात हुराकेन ईवो लॉन्च केली आहे. हे रेगुलर हुराकेनचा फेसलिफ्ट वर्जन आहे. हे केवळ ऑल-व्हील-ड्राइव्ह वर्जनमध्ये सादर केले गेले आहे. त्याची किंमत 3.73 कोटी रुपये (एक्स-शोरूम) आहे. त्याच्या डिझाइन आणि वैशिष्ट्यांमध्ये बरेच मोठे बदल झाले आहेत. ते आता पूर्वीपेक्षा अधिक तीक्ष्ण आणि आकर्षक असून जास्त एयरोडायनामिक बनवले गेले आहे. यात अॅडव्हान्स ट्रेक्शन कंट्रोल, टॉर्क व्हेक्टरिंग आणि अॅडप्टिव्ह सस्पेन्शन जसे फीचर देखील दिले आहेत. केबिनमध्ये 8.4 इंची टचस्क्रीन प्रणाली लागली आहे, जे एंड्रॉइड आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतात. यात ड्युअल कॅमेरा टेलीमेट्री सिस्टमचा पर्याय देखील आहे. रायडिंग सुधारण्यासाठी यामध्ये रीयर व्हील स्टियरिंग देखील देण्यात आला आहे.
 
लंबोरगिनी हुराकेन ईवोमध्ये 5.2 लीटर व्ही 10 इंजिन लावण्यात आले आहे, जे 640 पीसी पावर आणि 600 एनएमची टॉर्क देते. इंजिन 7-स्पीड ड्युअल-क्लच गियरबॉक्ससह सुसज्ज आहे, जो सर्व चाकांवर पावर सप्लाई करतो. 0 ते 100 किमी प्रति तास गती मिळवण्यासाठी यास 2.9 फक्त सेकंड लागतात.