शनिवार, 20 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 13 फेब्रुवारी 2019 (09:41 IST)

आपले मनपसंत चॅनल्सच्या निवडीसाठी मुदतवाढ ही आहे नवीन तारीख

The timeframe
देशातील टेलिकॉम रेग्युलॅरिटी ऑफ इंडिया (ट्राय) ने दिलेल्या नवीन निर्देशानुसार ग्राहकांना आपले आवडते टीव्ही चॅनल्सच्या निवडीसाठी ३१ मार्चपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. आता ग्राहकांना आणखी एका महिन्याचा वाढीव कालावधी मिळणार आहे. ग्राहकांच्या अनेक प्रश्नांना उत्तर मिळावी, त्यांना योग्य आणि आपल्या आवडीचे, आपल्या भाषेतील, आपल्या बजेट नुसार, आपण निवडलेल्या चॅनल्चे मासिक भाडे, ग्राहकांच्या हिताच्या दुष्टीने त्याने काय निवडावे ज्यामुळे त्याचा पैशाची बचत होईल यासंबधी सूचना, माहीती या अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना दिली जाणार आहे. ग्राहकांना त्याच्या आवडीचे चॅनल्स निवडण्यासाठी दिलेल्या ३१ मार्च या शेवटच्या तारखे पूर्वी ग्राहकाने चॅनल्सची निवड केली नाही तर आशा ग्राहकांची थेट योग्य त्या प्लान प्रमाणे, भाषे प्रमाणे ते ग्राहकांना प्लान लागू होणार आहेत. तर ग्राहकांनी निवडलेल्या चॅनल्सचे भाडे हे त्याच्या मासिक बेसीक पॅक पेक्षा जास्त नसावे असेही ट्रायकडुन सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता वेळ असून ग्राहकांनी थोडा विचार करून आपल्याला आवडते आणि खरच मनोरंजन करतील असे चॅनल्स निवडायची असून त्यामुळे आता होणारा गोंधळ कमी होणार असून ट्राय ने दिलेल्या नियमांत जर सर्व बसवून घेतले तर ग्राहकांचा मोठा फायदा होणार आहे.