मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019 (16:29 IST)

बांधकाम साहित्य महाग वाढणार घरांच्या किंमती

बांधकामाशी निगडित साहित्याचे दर वाढत आहेत, त्यामुळे येत्या काळात  घरांच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशाचा भार वाढणार आहे. यामध्ये  सिमेंट टनामागे ५००, तर लोखंड ७५० रुपयांनी महागले असून,  सिमेंट दरातील वाढीला देशांतर्गत कंपन्यांचा निर्णय घेतला आहे, तर लोखंडच्या किमतीतील वाढीला आंतरराष्ट्रीय बाजार कारणीभूत ठरले आहे. बांधकामासाठी लागणाऱ्या सिमेंट,  लोखंड  दोन अत्यावश्यक घटकांचा बाजार नेहमीच कमालीचा अस्थिर राहतो. २०१८ च्या  आॅक्टोबरपासून स्थिर असलेले सिमेंट आणि लोखंडाचे दर आता वाढतांना दिसून येत आहेत.  देशातील प्रमुख सिमेंट उत्पादक हे दक्षिण भारतातील आहेत. दक्षिणेतील उत्पादकांनी किंमत वाढविण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा परिणाम देशभरातील बाजारावर मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. कंपन्यानी आता मार्च २०१९ अखेर  आल्याने नफा वाढविण्याच्या हेतूने किमतीत वाढ केली आहे. मागणी अभावी या कंपन्यांची विक्री घटत आहे. त्यामुळे  नफाही फार  कमी होत आहे. नफा घटला की त्याचा परिणाम कंपन्यांच्या मानांकनांवर होतो.  मानांकन घटले की विदेशातील मागणी कमी होते. यामुळेच या कंपन्यांनी सिमेंटच्या ५० किलोच्या प्रति पोत्यामागे २० ते २५ रुपये वाढ करण्याचे ठरवले आहे. देशभरात सिमेंटच्या एका पोत्याची सरासरी किंमत ३२५ रुपयांवर असून, .
आंतरराष्ट्रीय स्तरावर लोखंड जवळपास ४० डॉलर प्रति टन महाग झाले आहे. त्यामुळे घरे महागतील असे चिन्हे आहेत.