शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 14 फेब्रुवारी 2019 (09:49 IST)

सरकारी कंपनी बी एस एन एल तोट्यात सरकारचा बंद करण्याचा विचार

प्रचंड आर्थिल तोट्यात असणाऱ्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) कंपनीतील गुंतवणूक काढून घेण्याच्या दिशेनं पावलं उचलण्यास भाजपा सरकारनं सुरुवात केली आहे. सोबतच कंपनी बंद करण्याचा विचारदेखील सरकारकडून सुरू झाला आहे. आर्थिक वर्ष 2017-18 याकाळात  बीएसएनएलचा एकूण तोटा 31,287 कोटी रुपयांवर पोहोचला असून, आता बीएसएनएल बंद करण्याबद्दल सरकारनं गांभीर्यानं विचार सुरू केला आहे. बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची काही दिवसांपूर्वीच केंद्रीय दूरसंचार सचिव अरुणा सुंदरराजन यांच्यासोबत बैठक सुद्धा  झाली असून, यामध्ये कंपनी बंद करण्याबद्दल चर्चा झाल्याचं वृत्त इंग्रजी वृतपत्र टाईम्स ऑफ इंडिया ने दिले आहे.  बैठकीत बीएसएनएलचे अध्यक्ष अनुपम श्रीवास्तव यांनी दूरसंचार सचिवांसमोर एक प्रेझेंटेशन ठेवल असून, यामधून कंपनीच्या आर्थिक परिस्थितीची संपूर्ण माहिती देण्यात आली. यात कंपनीचा एकूण आर्थिक तोटा, रिलायन्स जिओच्या आगमनामुळे झालेला परिणाम यासह कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छा निवृत्ती संदर्भातील आकडेवारीचा समावेश होता. जेव्हा पासून रिलायन्स जियो बाजारात दाखल झाले आहे तेव्हा पासून अनेक मोबाईल कंपन्या तोट्यात गेल्या आहेत, त्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहेत, त्यात सरकारी कंपनी सुद्धा सहभागी आहे. आता कंपनी सरकार वाचवणार की बंद करणार येत्या काही काळात समोर येणार आहे.