गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 13 फेब्रुवारी 2019 (16:03 IST)

LinkedIn मध्ये आला मोठा अपडेट, आता फेसबुकप्रमाणे करू शकाल लाइव्ह

लहान लहान व्हिडिओ आणि लाइव्हबद्दल बर्‍याच सोशल मीडिया कंपन्या गंभीर झाल्या आहेत. फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर नंतर आता लिंकेडीन (LinkedIn) मध्ये देखील लाइव्ह फीचर आला आहे, पण LinkedInच्या भारतीय यूजर्सना अद्याप वाट बघावी लागणार आहे, कारण या फीचरला सध्या अमेरिकेत सादर करण्यात आले आहे.  
 
माइक्रोसॉफ्टचे स्वामित्व असणारी कंपनी LinkedIn ने अमेरिकेत LinkedIn Live फीचर लॉचं केले आहे. याला खास करून त्या लोकांसाठी सादर करण्यात आले आहे जे कोणत्या मीडिया ब्रीफिंग किंवा प्रेस कॉन्फ्रेंसला लाइव्ह करण्यास इच्छुक असतात. LinkedIn लाइव्हमध्ये लोक फेसबुकप्रमाणे कॉमेंट करून प्रश्न विचारू शकतात.  
 
टेकक्रंचच्या रिपोर्टनुसार अमेरिकेत या फीचरचा वापर फक्त इनवाइटच्या माध्यमाने करू शकता, कारण LinkedIn लाइव्ह सध्या टेस्टिंग मोडमध्ये आहे आणि लवकरच याला सर्व लोकांसाठी जारी करण्यात येईल. लाइव्ह फीचरसाठी LinkedIn ने स्विचर स्टुडियो, सोशल लाइव आणि Wowza मीडिया सिस्टम सारख्या कंपन्यांशी भागीदारी केली आहे. तसेच LinkedIn लाइव्हला टेक्निकल सपोर्ट Azure  मीडिया सर्विसेज कंपनी देणार आहे.  
 
LinkedIn या फीचरबद्दल माहिती देताना सांगितले की LinkedIn चे प्रॉडक्ट मॅनेजर पीट डेविस यांनी सांगितले की व्हिडिओची या वेळेस सर्वात जास्त मागणी आहे.  अशात लोकांची आवड बघून या फीचरला लाँच करण्यात निर्णय घेतला. तसेच व्हिडिओसोबत विज्ञापन देण्याच्या प्रश्नांवर त्यांनी सांगितले की सध्या अशी कुठली ही योजना नाही आहे.