1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 13 फेब्रुवारी 2019 (11:41 IST)

राहुल गांधी हे परदेशी कंपन्यांचे लॉबिस्ट

Rahul Gandhi
काँग्रेस अध्यक्ष राहुल हे विमाने पुरविणार्‍या कंपन्यांचे लॉबिस्ट म्हणून काम पाहात आहेत, राहुल यांनी सादर केलेली कागदपत्रे खोटी आहेत. राफेलप्रकरणी राहुल यांच्याकडून नरेंद्र मोदी यांच्यावर झालेले आरोप लज्जास्पद आणि बेजबाबदारपणाचे आहेत, असे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.
 
राफेल व्यवहारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून मोदी सरकारवर आरोपांच्या फैरी सुरूच आहे. राहुल यांनी एअरबस कंपनीचा इमेल सादर करून अनिल अंबानी फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांना भेटले आणि त्यांनी 10 दिवसांत राफेल व्यवहारावर स्वाक्षरी होईल, असा खुलासा केला होता. त्यावर प्रसाद यांनी राहुल यांच्यावर पलटवार केला आहे.
 
राहुल यांना एअरबसचा इमेल कुठे मिळाला? राहुल यांनी एअरबस कंपनीचा जो इमेल सादर केला; तो राफेल संबंधित नसून अन्य कोणत्या तरी हेलिकॉप्टर व्यवहाराशी संबंधित आहे, असा दावा त्यांनी केला आहे. एअरबस या कंपनीबरोबर काँग्रेस सरकारच्या काळात झालेले व्यवहार संशयास्पद आहेत. आम्ही राहुल यांचा खोटेपणा जनतेसमोर आणू, असा इशारा त्यांनी दिला आहे.