बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 13 फेब्रुवारी 2019 (09:45 IST)

एक कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त

बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा परीसारतील मोहेंगाव येथे २००, ५०० आणि २००० रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. . या नोटांची किंमत एक कोटींच्या घरात आहे. या सर्व बनावट नोटा पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून, प्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. बोराखेडी पोलिसांनी येथील आश्रम शाळेमागील शेतातून कोट्यवधींच्या बनावट नोटांनी भरलेली बॅग बोराखेडी पोलिसांनी जप्त केली आहे. मोहेंगाव जवळ पोलिसांना याबाबत गुप्त  माहिती मिळाली,  त्यानंतर बोराखेडी पोलिसांनी येथील आश्रम शाळेमागील शेतातून कोट्यवधींच्या बनावट नोटांनी भरलेली बॅग जप्त केली आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या नोटांचे संपूर्ण मूल्य किती आहे, हे अद्याप पूर्ण समजू शकले नाही. या बनावट नोटांची मोजदाद अजूनही  सुरू होती. अंदाजे एक कोटी रुपयांचे हे बनावट चलन असल्याचे सांगण्यात येत आहे. २००, ५०० आणि २००० रुपयांच्या बनावट नोटा असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.