सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : सोमवार, 25 फेब्रुवारी 2019 (15:52 IST)

2019 Ford Endeavour नवीन अवतारात लॉन्च

फोर्डची प्रिमियम एसयूव्ही 2019 Ford Endeavour चा अपडेटेड ऍडिशन बाजारात आला आहे. त्याची प्रारंभिक किंमत 28.19 लाख रुपये (एक्स शोरूम किंमत) आहे. कंपनीने नवीन फोर्डला 6 स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन, 2.2 लीटर डीझल इंजिनासह लॉन्च केलं आहे. 
 
फोर्ड इंडियाने एका वक्तव्यात म्हटले आहे की या अंतर्गत, तीन पर्याय 2.2 लीटर, 3.2 लीटर डिझेल इंजिन आणि सहा स्पीड ऑटोमॅटिक ट्रांसमिशन उपलब्ध असतील. या अपडेट ऍडिशनची किंमत 33.31 लाख रुपये पर्यंत जाईल. नवीन फोर्ड एन्डेव्हरच्या लाँचिंगच्या वेळी फोर्ड इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनुराग मेहरोत्रा यांनी सांगितले की फोर्ड एन्डेव्हरचा नवीन ऍडिशन एन्डेव्हरची वारसा पुढे वाढवेल. 
 
त्याच वेळी कंपनीने सांगितले की अपडेटेड एन्डेव्हरमध्ये नवीन डिझाइनच्या 18-इंच एलोय व्हीलसह आठ-बाजूचे पॉवर एडजस्टेबल ड्राइव्हर आणि चांगल्या सोयीसाठी फ्रंट पॅसेंजर सीट देण्यात आली आहे.