सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

या प्रकारे अँड्रॉइड फोनवर रेकॉर्ड होऊ शकतात व्हॉट्सअॅप कॉल

अँड्रॉइड यूजर्ससाठी खुशखबर आहे की सामान्य कॉलप्रमाणेच आता व्हॉट्सअॅप कॉल देखील सोपारीत्या रेकॉर्ड करता येतील. यूजर्सच्या सुविधेसाठी कंपनीने आपल्या सेवेत सुधारणा केली असून आता अवघ्या एका क्लिकवर कॉल रेकॉर्ड करता येणार आहे. ही सुविधा अँड्रॉइड आणि आयफोन अशा दोन्ही सिस्टिमवर उपलब्ध असेल. मात्र हा कॉल रेकॉर्ड करताना तुम्हाला समोरच्या व्यक्तीची परवानगी घ्यावी लागणार आहे. 
 
या प्रकारे करा रेकॉर्ड
Cube Call Recorder च्या साहाय्यानेही अँड्रॉइड फोनवर व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्डिंग करता येते. मात्र ही सुविधा सर्व फोनवर उपलब्ध नसते.
आपल्या फोनवर ही सुविधा उपलब्ध असल्यास इंस्टॉल करा.
अॅप इंस्टॉल केल्यावर क्यूब कॉल रेकॉर्डर अॅप उघडा आणि व्हॉट्सअॅपवर स्विच करा.
आता त्या व्यक्तीला कॉल करा ज्यांशी बोलायचे आहे.
कॉल कनेक्ट झाल्यावर क्यूब कॉल विजेट शाईन करेल ज्याने कॉल रेकॉर्ड होत आहे हे माहीत पडेल.
या प्रक्रियेत समस्या येत असल्यास क्यूब कॉल रेकॉडर अॅपवर जाऊन सेटिंग्जमध्ये जा आणि व्हा‌इस कॉल रूपात फोर्स VoIP कॉल निवडा.
सेटिंग्ज बदल्यानंतर आपण पुन्हा व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्ड करू शकता.
तरीही समस्या येत असल्यास ही सुविधा आपल्या फोनवर उपलब्ध नाही.
 
या व्यतिरिक्त रेकॉर्ड करण्यासाठी हे करून बघा
मॅक आणि आयफोनच्या माध्यमातून अँड्रॉइड किंवा आयफोनवर कॉल रेकॉर्डसाठी
फोन लायटिंग केबलच्या साहाय्याने मॅकशी जोडा
आता आयफोनवर ‘Trust This Computer’ पर्याय निवडा. हा पर्याय पहिल्यांदाच फोन मॅकला जोडण्यावर येतो.
मॅकवर ‘QuickTime’ सुरू करा.
Quick Time मध्ये रेकॉर्ड बटणाच्या खाली दिसणाऱ्या ऐरोवर क्लिक करत आयफोनचा पर्याय निवडा.
Quick Time मध्ये रेकॉर्ड बटणावर क्लिक करा.
आयफोनच्या मदतीने व्हॉट्सअॅप कॉल करा.
कॉल कनेक्ट झाल्यानंतर Add User Icon वर क्लिक करा. 
नंतर तुम्हाला ज्या व्यक्तीशी बोलताना कॉल रेकॉर्ड करायचा त्या व्यक्तीचे नाव निवडा.
कॉल संपल्यावर Quick Time मध्ये जाऊन रेकॉर्डिंग थांबवा आणि फाइल मॅकमध्ये सेव्ह करा.