सोमवार, 29 सप्टेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 20 मार्च 2019 (18:04 IST)

आलिया भट्टने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी ड्रायव्हर आणि हेल्पर यांना दिली विशेष भेट

alia bhatt
बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री आलिया भट्टने 15 मार्चला आपला 26वा वाढदिवस साजरा केला. या दरम्यान तिला अनेक भेटवस्तू मिळाल्या. पण वाढदिवसाच्या दिवशी आल्याने आपल्या ड्रायव्हर आणि हेल्पर यांना विशेष भेट दिली आहे. 
 
अहवालानुसार, आलियाने आपल्या ड्रायव्हर सुनील आणि हेल्पर अनमोलला 50 लाख रुपये दिले आहे. आलियाचा ड्रायव्हर आणि हेल्पर मुंबईत स्वत:चे घर विकत घेऊ शकतील हे लक्षात ठेवून कॅश गिफ्ट दिले. हे दोघे आलियाच्या करिअरच्या सुरुवातीपासून तिच्यासोबत आहे. बातम्यांनुसार सुनील आणि अनमोलने आलियाकडून मिळालेल्या या पैशातून घर बुक देखील केले आहे. सुनीलने जुहू गल्लीमध्ये तर अनमोलने खार परिसरात त्यांचे 1 बीएचके घर बुक केले आहे. 
 
आलिया भट्ट सध्या आपल्या आगामी चित्रपट 'कलंक' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्या बरोबर वरुण धवन, माधुरी दीक्षित, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य रॉय कपूर काम करत आहे. या चित्रपटाचा पहिला गाणं 'घर मोरे परदेसिया' रिलीज झाला आहे. या गाण्यात आलियाच्या कथक नृत्याचे कौतुक केले जात आहे.