रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 2 मार्च 2019 (13:08 IST)

उबेर चालकांनाही मिळेल मोदी सरकारच्या 'मोफत' योजनेचा फायदा

अॅप आधारित टॅक्सी सेवा प्रदाता कंपनी उबेर (Uber) ने त्याच्याशी संबंधित ड्रायव्हर्सच्या विनामूल्य उपचारांसाठी मोदी सरकार (Modi Govt) च्या आरोग्य विमा योजना आयुष्मान भारता (Ayushman Bharat Yojana) सोबत भागीदारी करारावर स्वाक्षरी केली आहे.
 
पंतप्रधान जन आरोग्य योजने (आयुष्मान भारत) ला अमलात आणणार्‍या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने या संदर्भात, उबेरसह एमओयू केले आहे. करारानुसार, उबेर कंपनी ड्राइव्हर्ससाठी आपल्या उबेर केअर उपक्रमाच्या अंतर्गत संपूर्ण भारतात सेवा केंद्रात सेवा केंद्र तयार करतील.
 
प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ इंदू भूषण यांनी म्हटले आहे की अखेरच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे हेच आयुष्मान भारत योजनेचे उद्देश आहे. यामुळे गंभीर आजारांसाठी विनामूल्य उपचार प्रदान करता येईल. उबेर इंडिया आणि दक्षिण आशियाचे अध्यक्ष प्रदीप परमेश्वर म्हणाले की आमच्या कामाच्या केंद्रात ड्रायव्हर देखील एक भागीदार आहे आणि आमच्यासोबत काम करताना त्यांनी वारंवार मजबूत सुरक्षा यंत्र, विशेषतः चांगल्या आरोग्य सुविधांची गरज असल्याचे नमूद केले आहे.