शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

बिल गेट्स यांच्याकडून 'आयुष्यमान भारत' योजनेचे कौतुक

मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक आणि गेट्स फाऊंडेशनचे सह-अध्यक्ष बिल गेट्स यांनी केंद्र सरकारच्या 'आयुष्यमान भारत' योजनेच्या यशस्वीतेमुळे गेट्स यांनी ट्विटरवरुन पीएमओ आणि भारत सरकारचे अभिनंदन केले. केवळ 100 दिवसांत 6 लाखांपेक्षा अधिक रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे वाचून आपल्याला आनंद झाल्याचे गेट्स यांनी म्हटलंय.
 
बिल गेट्स यांनी आपल्या ट्विटर अकाऊंवरुन भारत सरकारचे कौतुक केले. 'आयुष्यमान भारत' योजनेच्या पहिल्या 100 दिवसांच्या यशस्वीतेबद्दल भारत सरकारचे अभिनंदन. या योजनेचा फायदा लोकांकडून मोठ्या प्रमाणात घेण्यात येत आहे, हे ऐकून आनंद झाला, असे ट्विट गेट्स यांनी केले आहे. बिल गिट्स यांनी आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांचे ते ट्विट रिट्विट करून भारत सरकारला शुभेच्छा देत अभिनंदन केलं आहे.