शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

चीनच्या 'या' भागात नाताळ साजरा करण्यावर बंदी

चीनमधील चार शहरे आणि एका काऊंटीमध्ये नाताळ साजरा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सत्तेत असलेल्या कम्युनिस्ट पार्टी व राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
 
याबद्दल सिंगापूर येथील राजारत्नम स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजचे चीनी तज्ज्ञ जी यांग यांनी सांगितले की जेव्हापासून जिनपिंग यांनी सत्ता सांभाळली आहे तेव्हापासून पारंपारिक सण साजरे करण्यावर सरकारचा भर आहे. 
 
बदलत जाणाऱ्या जगात चीनी परंपरा कायम राहावी यासाठी सरकारने धर्मयुद्धच पुकारले आहे. त्यामुळेच इतर धर्मियांचे सण साजरे करण्यावर सरकारने बंदी घातली आहे. नाताळ साजरा करण्यासाठी चर्चेला 20 हजार रुपयेच खर्च करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचना न पाळल्यास कारवाई करण्यात येईल असेही सरकारने स्पष्ट केले आहे.