1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

भाजपच्या गणतंत्र बचाओ यात्रेला परवानगी नाही

BJP Gantantra bachao yatra
कोलकाता हायकोर्टाने पश्चिम बंगालमध्ये भाजपाला गणतंत्र बचाओ यात्रा काढण्याची परवानगी देणारा निर्णय अवघ्या एक दिवसात फिरवला. द्विसदस्यीय खंडपीठाने हा निर्णय रद्द केला आहे.
 
भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या गणतंत्र बचाओ रथयात्रेला पश्चिम बंगाल सरकारने परवानगी नाकारली होती.  येत्या २२ डिसेंबरपासून या रथयात्रेला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाने कोलकाता हायकोर्टात याचिका दाखल केली होती. गुरुवारी कोलकाता हायकोर्टाच्या एक सदस्यीय पीठाने या याचिकेवर निर्णय देताना भाजपाला रथयात्रेची परवानगी दिली होती.