बारामतीत भिंतीवर हार्ट काढणाऱ्या टायर मध्ये टाकून चोपा, अजित पवारांचे वादग्रस्त विधान
कुठं भिंतीवर हार्ट काढत बसून नका, मी कॅमेरे बसवणार आहे. कुणी सापडले तर त्याला टायरमध्येच टाकतो, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलाय. अजित पवारांच्या हस्ते बारामती शहरातील सावतामाळी सभागृह भूमिपूजनाचा वेळी ते बोलत होते.
बारामती विधानसभा मतदारसंघातील एका कार्यक्रमादरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीवासीयांना कडक इशारा दिला. भिंती आणि पदपथांवर हार्ट" चिन्ह काढणाऱ्यांना टायरमध्ये टाकून चांगले झोडून काढा.असा इशारा दिला आहे. सध्या बारामतीत भिंतीवर हार्ट काढण्याची प्रस्त वाढले आहे. या मुळे बारामतीची स्वच्छता देखील धोक्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत बारामतीवासीयांना कडक इशारा दिला. ते म्हणाले, "जर बारामतीमध्ये भिंतीवर कोणी हार्ट बनवताना आढळले तर लक्षात ठेवा मी केमेरे बसवणार आहे पकडल्यागेल्यावर त्यांना टायरमध्ये घालून बदडून .
सार्वजनिक मालमत्तेचे अशा प्रकारचे नुकसान सहन केले जाणार नाही. असे विधान अजित पवारांनी केले.
अजित पवार हे त्यांच्या स्पष्टवक्त्या विधानांसाठी ओळखले जातात. ते पक्षाच्या कार्यकर्त्यांना, प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि अगदी पक्षाच्या नेत्यांनाही कडक इशारा देतात. कधीकधी, हे स्पष्टवक्तेपण त्यांच्यावर उलटते.
Edited By - Priya Dixit