शनिवार, 13 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 डिसेंबर 2025 (17:30 IST)

मनपा निवडणुका लवकरच, 15 डिसेंबर आचारसंहिता लागू होण्याचे संकेत

voting
राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून महानगरपालिका निवडणुका आता लवकरच होणार असून येत्या 15 डिसेंबर नंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होऊन आचार संहिता लागण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. निवडणुका साठी सर्व मोठ्या शहरांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. 
महानगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया वर्गवारीनुसार दोन टप्प्यांत करण्याचा विचार केला जात आहे. 
महापालिका निवडणुका वर्गवारी 
अ+ वर्ग : बृहन्मुंबई
अ वर्ग : पुणे, नागपूर
ब वर्ग : ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड
क वर्ग : नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर
ड वर्ग : उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, मीरा-भाईंदर, पनवेल, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, मालेगाव, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली-मिरज-कुपवाड, नांदेड-वाघाळा, जालना, लातूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर
ओबीसी आरक्षण 50 टक्के जास्त असल्याने नागपूर आणि चंद्रपूरच्या निवडणुकांचा मार्ग आखडला आहे. तर इतर 27 महापालिकांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा आहे. 
यंदा मतदानाची संभाव्य तारख्या 14 किंवा 15 जानेवरी आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार जानेवरीपर्यंत निवडणुका पूर्ण करायचे असून निवडणुका आयोग तयारीला लागले आहे. 
प्रभागनिहाय मतदार याद्या 15 डिसेंबरपूर्वी प्रकाशित करण्यात येईल नंतर कधीही आचारसंहिता लागू होऊ शकते. 
मतदानासाठी 14 किंवा 15 जानेवरी दोन पर्याय असू शकतात. 
Edited By - Priya Dixit