1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. rape with engineer girl in uber cab in greater noida

इंजिनियर तरुणीसोबत उबर कॅबमध्ये दुष्कर्म

greater noida
ग्रेटर नोएडा वेस्ट स्थित सोसायटी रहिवासी एका इंजिनियर तरुणीसोबत उबर कॅब चालकाने दुष्कर्म केले. ही घटना 5 फेब्रुवारीची आहे. चौकशी करून 9 फेब्रुवारीला पोलिसांनी दुष्कर्म करण्याचा प्रयत्न केल्या जाण्याची रिर्पोट दाखल केली, जी पीडिताने कोर्टात दिलेल्या वक्तव्याच्या आधारावर दुष्कर्म मध्ये परिवर्तित केली गेली.
 
पोलिसांनी आरोपी चालक नूंह जिल्हा रहिवासी आरव उर्फ नरवीर यादव आणि कॅब मालक महेंद्रगढ रहिवासी जोगेंद्रला अटक केली आहे. पोलिसांप्रमाणे मुलगी एका आयटी कंपनीत इंजिनियर आहे.
 
तिने 5 फेब्रुवारी रात्री 10:15 सुमारास सोसायटीहून नोएडा जाण्यासाठी कॅब बुक केली होती. बुकिंग आयडीवर जोगेंद्र असं नाव लिहिलेले होते परंतू त्याचा मित्र आरव उर्फ नरवीर यादव कॅब घेऊन आला. आरव तिला चुकीच्या मार्गावर घेऊन गेला.
 
पीडिताने मोबाइलवर गूगल मॅपच्या मदतीने रुट बघितला आणि चालकाला चुकीचा रस्ता असल्याचं सांगितलं. नंतर चालकाने तिचा मोबाइल जप्त करून कॅब सुनसान जागी उभी केली आणि जीव घेण्याची धमकी देत दुष्कर्म केलं. जाताना त्याने पीडिताकडून एक हजार रुपयाची रक्कम देखील हिसकावून घेतली.
पुढील लेख
रांची क्रिकेट स्टेडियच्या पॅव्हेलियनला दिले धोनीचे नाव