सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

पुलवामामध्ये आत्मघाती हल्ला करणारा कोण होता आदिल अहमद? काय होता त्याचा शेवटला मेसेज?

दक्षिण कश्मीरच्या पुलवामाम सर्वात मोठा दहशतवादी हल्ल्यामुळे देशात हादरलं आहे. जैश-ए-मोहम्मद संघटनेने हल्ल्याची जवाबदारी घेतली असून यामागे हल्लाखोर आदिल अहमद उर्फ वकास हे नाव समोर आले आहे. जाणून घ्या कोण आहे आदिल अहमद, ज्याने 350 किलोग्रॅम विस्फोटाने भरलेली स्कॉर्पियोने सीआरपीएफ जवानांच्या बसला धक्का मारला.
 
21 वर्षीय आदिलने हा स्फोट घडवनू आणाला. पुलवामा जिल्ह्यातच्या काकापोर येथील आदिल 2018 साली दहशतवादी संघटन जैश ए मोहम्मदमध्ये सामील झाला होता. आदिलने अलीकडेच अफगान मुजाहिद जैश दहशतवादी गाजी रशीदकडून ट्रेनिंग घेतली होती.
 
जैश-ए-मोहम्मदने दावा केला आहे की आदिल पुलवामाच्या गुंडीबाग भागात राहत होता. हल्ला करण्यापूर्वी जवानांच्या गाडीवर फायरींग देखील केली गेली होती. हा काफिला जम्मू ते कश्मीरकडे जात होता. आणि हल्ल्याचा प्रकार अफगानिस्तान आणि पाकिस्तानमध्ये सुरक्षाबळांना निशाणा बनवण्यासाठी करण्यात येतो तशातला होता.
 
हल्ल्याच्या काही वेळापूर्वीच फिदायीन आदिल अहमदचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात आदिल स्पष्ट सांगत होता की आपल्यापर्यंत हा व्हिडिओ पोहचेल तोपर्यंत मी जन्नतमध्ये मजा करत असेन. त्याने म्हटले की मी जैश ए मोहम्मदमध्ये एक वर्ष होतो आणि आता हा माझा शेवटचा मेसेज आहे. 
 
आदिल जास्त शिकलेला नव्हता. तो एका स्थानिक मशीदित अजान देखील देत होता.
 
माहितीप्रमाणे आदिल 19 मार्च 2016 ला पुलवामाच्या गुंडीबाग येथून गायब होऊन गेला होता. त्याचे दोन मित्र तौसीफ आणि वसीम देखील गायब होते. तौसीफचा मोठा भाऊ मंजूर अहमद देखील दहशतवादी होता ज्याचा 2016 मध्ये ठार झाला होता.