रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

उरी फेम विक्की कौशलसह बॉलीवूड सेलिब्रिटीज पुलवामा हल्ल्यामुळे स्तब्ध आणि नाराज

पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यानंतर सीआरपीएफचे 37 जवान शहीद झाल्याची बातमी आहे अनेक जखमी आहेत. या हल्ल्यामुळे देशवासीयांसह बॉलीवूड स्टारदेखील स्तब्ध आहेत. अनेक कलाकारांनी या हल्ल्याची निंदा करून आपली नाराजगी प्रकट केली आहे.
 
विक्की कौशल
'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' फेम विक्की कौशलने पुलवामा दहशतवादी हल्ल्यावर दुःख प्रकट करत लिहिले- 'मी खूप हैराण आणि दुखी आहे. शहीद बहादूर जवानांच्या कुटुंबीयांसाठी संवेदना आणि जखमी जवानांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो.'
 
अमिताभ बच्चन
बॉलीवूड महानायकने दुःख प्रकट करत लिहिले- पुलवामाहून परेशान करणारी बातमी आली आहे जेव्हा लोकं प्रेमाच्या उत्साहात असतात अशात घृणा आपलं कुरूप डोकं उचकवतं. माझे विचार आणि प्रार्थना शहीद कुटुंबीयांसोबत आहे.
 
रणवीर सिंह
'गली ब्वॉय' फेम रणवीर सिंहने ट्विटरवर दुःख प्रकट करत लिहिले- 'हा हल्ला घृणास्पद आणि भ्याडपणा दर्शवणारा आहे. आमच्या बहादूर जवानांच्या कुटुंबीयांसाठी संवेदना.'
 
सलमान खान
सुपरस्टार सलमान खानने दुःख प्रकट करत लिहिले की मला अत्यंत धक्का बसला जेव्हा देशातील जवानांनी आपले प्राण गमावले आणि त्यांचे कुटुंबी शहिदांचे कुटुंबी झाले तेही आमच्या कुटुंबीयांना वाचवण्यासाठी.
 
जावेद अख्तर
मशहूर कवी आणि गीतकार जावेद अख्तर लिहितात- सीआरपीएफशी माझे खास नातं आहे, मी पेन कागदावर ठेवण्यापूर्वी त्यांचे गीत लिहिले आहे, मी अनेक सीआरपीएफ अधिकार्‍यांना भेटलो आहेत आणि बहादुरांसाठी मी त्यांच्या कडून नेहमी सन्मान आणि प्रेम शिकलो आहे. मी शहिदांसाठी दुःख प्रकट करतो.
 
ऋषी कपूर
सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत असलेले ऋषी कपूरने देखील या हल्ल्याची निंदा केली करत हे भ्याड असल्याचे म्हटले. ट्विट- 'हे भ्याडपणा दर्शवतं. अशा भयानक गुन्हा करणार्‍या काश्मिराच्या लोकांना मित्र बनवू शकत नाही.'
 
अनुपम खेर 
अनुपम खेरने दुःख प्रकट करत लिहिले की - 'या भ्याड हल्ला बघून दुखी आणि क्रोधित आहे, ज्या कुटुंबीयांनी आपला मुलगा, भाऊ, नवरा, वडील गमावला आहे त्यांच्या प्रती संवेदना आणि जखमी जवानांच्या आरोग्यासाठी प्रार्थना.'
 
या व्यतिरिक्त प्रियंका चौप्रा, अक्षय कुमार, अनुष्का शर्मा, रितेश देशमुखसह अनेक बॉलीवूडच्या लोकांनी सांत्वन केले आहेत.