सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

सी-फूड खाल्ल्यामुळे सोनू निगमची तब्येत बिघडली, ICU मध्ये भरती

बॉलीवूडचे प्रसिद्ध गायक सोनू निगम हल्ली आजारी आहे. सोनूला ऍलर्जी झाली आहे ज्यामुळे त्याच्या डोळ्याला सूज आली असून त्याला आयसीयूत भरती करण्यात आले आहे.
 
माहितीनुसार अलीकडेच सोनूने एमटीव्ही अनप्लग्ड सीझन 8 ची शूटिंग करण्याच्या लगेच नंतर बीकेसी जवळ काही खाल्ले. ज्यामुळे त्याला गंभीर ऍलर्जी झाली. शरीरावर निशाण होऊ लागले. नंतर सोनूला स्कीनवर ऍलर्जी असल्याचे जाणवले. नंतर त्यांनी औषध घेतली तरी बरं वाटले नाही तर प्रकरण गंभीर असल्याचे कळता त्यांनी नानावटी हॉस्पिटल गाठले. जिथे डॉक्टरांनी त्यांना लगेच आयसीयूत भरती होण्याचा सल्ला दिला.
 
सोनू निगमने इंस्‍टाग्रामवर दोन फोटो शेअर करत म्हटले की सी फूड खाल्ल्यामुळे असे काही घडेल.. असा कधी विचार देखील केला नव्हता. वेळेत हॉस्पिटल पोहचू नसतो तर समस्या अजून वाढली असते.
एका फोटोमध्ये सोनू निगम आयसीयूत भरती आहे तर दुसर्‍या फोटोमध्ये त्याच्या डोळ्यावर सूज दिसतेय. सोनूची अशी तब्येत बघून त्याचे चाहते चिंतित झाले असून त्यांनी सोनूची तब्येत लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थना केली. आता सोनू घरी आराम करत आहे.