मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

काश्मिरात 11 दहशतवाद्यांचा खात्मा

दक्षिण काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि अतिरेक्यांदरम्यान सुरु असलेल्या चकमकीत तीन जवान शहीद झाले आहेत. या चकमकीत दोन नागरिकही ठार झाले असून 11 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आले आहे, अशी माहिती जम्मू- काश्मीरचे पोलिस महासंचालक एस.पी. वैद्य यांनी दिली.
 
एकाला जिवंत पकडण्यात आले असून तो हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
फुटीरवाद्यांचा दोन दिवसांचा बंद
भारतीय लष्कराने अकरा अतिरेकी आणि दोन नागरिकांना ठार केल्याच्या निषेधार्थ फुटीरवाद्यांनी दोन दिवसांचा काश्मीर बंदचे आवाह्न केले आहे. दरम्यान, फुटीरवादी नेते मिरवाईज उमर फारुक यांना त्यांच्या निवासस्थानी नजरकैदेत ठेवण्यात आले असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
 
जेआरएल या फुटीरतावादी संघटनेने आज आणि उद्या बंद पुकारला आहे. तसेच लोकांना कामधंदा सोडून सायकाळी निघणार्‍या जनाजे की नमाज मध्ये भाग घेण्याचेही आवाहन् केले आहे.