गुरूवार, 7 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

1 एप्रिलपासून सरकारकडून या गोष्टींमध्ये बदल

national news
आता 1 एप्रिलपासून सरकार अनेक गोष्टींमध्ये बदल करणार आहे. बॅंकींग, ट्रेनचा प्रवास किंवा गाडीचा इंशोरन्स या सगळ्यात काही ना काहीतरी बदल होणार आहेत. यामध्ये खालील गोष्टी बदलणार आहेत. 
 
1. रेल्वे तिकीट स्वस्त होणार आहे. सरकारने या वर्षाच्या बजेटमध्ये ऑनलाईन तिकीट बुक करण्यासाठी लागणारा टॅक्स कमी केला आहे. सर्व्हीस टॅक्स कमी झाल्याने ई-तिकीट बुक करणे स्वस्त होणार आहे.
 
2. 1 एप्रिलपासून SBI च्या मिनिमम बॅलन्स चार्जेस कमी होणार आहेत. याचा अर्थ भारतीय स्टेट बॅंकेच्या ग्राहकांना मिनिमम बॅलन्स ठेवण्यावर कमी चार्ज लागेल. SBI ने मिनिमम बलन्स चार्जवर 75%  कमी करण्याची घोषणा केली आहे.
 
3. भारतीय रिजर्व्ह बॅंकेने बेस रेटला एमसीएलआर लिंक करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 एप्रिलपासून नवीन व्यवस्था लागू होणार आहे. एमसीएलआरवर लोन घेणाऱ्या ग्राहकांना फायदा मिळेल. याचा अर्थ व्याज दर कमी झाल्यास त्याचा फायदा नक्कीच ग्राहकांना मिळेल. 
 
4. 1 एप्रिलपासून थर्ड पार्टी मोटर बीमा प्रिमियम स्वस्त होईल. इंशोरन्स रेग्युलेटर भारतीय बिमा आणि विनियामक विकास प्राधिकरण (Irdai)ने थर्ड पार्टी मोटर बीमा प्रिमियमचे दर कमी केले. हे दर 10 ते 25% कमी करण्यात आले आहेत.
 
5. पोस्ट ऑफिस पेमेंट बॅंकेची सुरूवात या आर्थिक वर्षापासून होईल. जे लोक ग्रामीण भागात राहतात त्यांना याचा फायदा होईल. येथे देखील तुम्हाला बॅंकेप्रमाणे पेटीएम आणि डिमांड ड्राफ्ट सोबतच इतर सुविधाही मिळतील.