सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 मार्च 2019 (10:05 IST)

मध्यरात्री आलियाच्या घरी पोहोचला रणबीर, बर्थ डे विश करून केले सरप्राइज

Happy Birthday Alia Bhatt: बॉलीवूडची सर्वात क्यूट एक्ट्रेस आलिया भट्ट आज अर्थात 15 मार्च रोजी आपला 26वा वाढदिवस साजरा करत आहे. या दिवसाला ती वेळग्यारित्या सेलिब्रेट करण्यास इच्छुक आहे. वृत्त असे आहे की आलिया आधी आपली आई सोनी राजदानचे चित्रपट 'नो फादर्स इन कश्मीर’ला प्रोमोट करेल. त्यानंतर ती  तिचे चित्रपट ब्रह्मास्त्रच्या प्रमोशनासाठी रणबीर कपूरसोबत वेळ घालवेल. या सर्वांमध्ये काल मध्य रात्री रणबीर कपूरला आलियाच्या घराबाहेर बघण्यात आले. असे ऐकण्यात आले आहे की रणबीरला आलियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा सर्वात आधी द्यायच्या होत्या. म्हणून तो अर्ध्या रात्री आलियाच्या घरी पोहोचला.  
 
सांगायचे म्हणजे आलिया भट्ट आज 26 वर्षांची झाली आहे. तिचा जन्म साल 1993 मध्ये झाला होता. आलिया भट्ट ने आपल्या फिल्मी करियरची सुरुवात 2012मध्ये  फिल्म 'स्टूडेंट्स ऑफ द ईयर' पासून केली होती. त्यानंतर तिने बर्‍याच शानदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या तिचे रणबीर कपूरसोबत अफेयरची चर्चे सुरू आहे. नुकतेच हे दोघेही वेलेंटाईन डे वर एका प्रायवेट डेटवर गेले होते. या दरम्यान त्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर वायरल झाले होते.