बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 11 मार्च 2019 (15:43 IST)

कबड्डीपटू बनून 'पंगा'घेणार कंगना

अभिनेत्री कंगना राणावतच्या मणिकर्णिका या चित्रपटाने यावर्षीच्या सुरुवातीलाच बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून दिली. या चित्रपटात कंगनाचा वेगळाच अवतार आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर आता कंगना एका आगळ्यावेगळ्याच अंदाजात आपल्या भेटीला येणार आहे. नुकतीच कंगनाच्या आगामी 'पंगा' चित्रपटाचा फर्स्टलूक आणि प्रदर्शनाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. आगामी 'पंगा' चित्रपटातून कंगना प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील कबड्डीपटू यांच्यावर 'पंगा' चित्रपट आधारित आहे. कंगना चित्रपटात कबड्डी खेळताना दिसणार आहे. कंगनाच्या या आगामी चित्रपटाचा फर्स्टलूक आणि प्रदर्शनाची तारीख ट्रेड अनालिस्ट तरण आदर्श यांनी शेअर केली आहे. 'पंगा' 24 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कंगनासोबत प्रसिद्ध पंजाबी अभिनेता जस्सी गिल स्क्रिन शेअर करणार आहे. कंगनाचा जस्सी गिलसोबत हा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटात कंगनाच्या पतीची भूमिका जस्सी गिल साकारणार आहे. जस्सी व्यतिरिक्त चित्रपटात ऋचा चड्ढा आणि नीना गुप्ता यांच्या देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.