मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 9 मार्च 2019 (14:59 IST)

बॉलिवूडमधली ही अभिनेत्री कंगनाला सर्वाधिक प्रिय

अभिनेत्री कंगना राणावत हिचा बॉलिवूड द्वेष जगजाहीर आहे. बॉलिवूडमधले अनेक कलाकार तिच्या 'हिट लिस्ट'वर आहेत. यात करण जोहर, हृतिक रोशन, आलिया रणबीरपासून ते खान मंडळींचाही समावेश आहे. मात्र संपूर्ण बॉलिवूडमध्ये कंगनाला एक अभिनेत्री मात्र खूपच आवडते. तिच्यापासून मला प्रेरणा मिळते असं कंगना जाहीरपणे सांगते. ही अभिनेत्री म्हणजे करिना कपूर खान होय. 'करिना ही प्रेमळ आहे. जर अभिनेत्री, पत्नी आणि आई असावी तर ती करिनासारखी. ती एक परिपूर्ण स्त्री  आहे. ती नेहमीच मला प्रोत्साहन देते. करिना एक प्रेरणादायी स्त्री आहे. ती मला सकारात्क संदेश पाठवते. अशा शब्दात कंगनानं करिनाचं कौतुक केलं आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत करिनानं देखील कंगनाच्या कामाचं कौतुक केलं होतं. कंगनाची बायोपिक पाहाण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे असं करिना म्हणाली होती. तसेच मणिकर्णिकाच्या यशाबद्दल करिनानं कंगनाला भरभरून शुभेच्छाही दिल्या होत्या.