मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 मार्च 2019 (11:27 IST)

इरफान खान लवकरच करणार कमबॅक

न्यूरो इन्डोक्राईन ट्युमर नावाच्या गंभीर आजारावर उपचार घेण्यासाठी इरफान खान गेल्या वर्षभरापासून इंग्लंडला गेला होता. आता तो परत आला आहे. आता त्याच्यावरचे पुढचे उपचार मुंबईत होत आहेत. पणआता त्याची प्रकृती खूपच सुधारली आहे आणि आता तो लवकरच रुपेरी पडावर 'कम बॅक' करणार आहे. तिगंशू धुलियाने एका इंटरव्ह्यूमध्ये ही माहिती दिली आहे. 'हिंदी मीडियम'च्या सिक्वेलच्या कामाला इरफान लवकरच सुरुवात करणार आहे. त्याने स्वतःच आपल्याला ही माहिती दिल्याचे तिगंशूने सांगितले. 2017 मध्ये इरफानच्या 'हिंदी मीडियम'ला खूपच चांगला प्रतिसाद ळिाला होता. सबा करबरोबरची त्याची ऑनस्क्रीन केस्ट्रिीही प्रेक्षकांना खूप आवडली होती. 'हिंदी मीडियम'चा सिक्वेल करण्याचे जेव्हा ठरले तेव्हा इरफान आजारी होता. त्याच्याशिवाय या सिनेमाचा दुसरा भाग करण्याचा विचारही करणे शक्य नाही, असे निर्मात्यांनी म्हटले होते. मात्र आता इरफान परत आल्यामुळे या सिनेमाच्या दुसर्‍या भागाच्या तयारीला वेग आला आहे. सध्या या सिनेमाच्या स्क्रीप्टला फायनल टच दिला जातो आहे. 'हिंदी मीडियम' 2020 मध्ये रिलीज होणे अपेक्षित आहे.