शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 18 फेब्रुवारी 2019 (13:29 IST)

अमिताभ बच्चन लवकरच आणत आहे 'कौन बनेगा करोड़पति' सीझन 11

टीव्हीचे सर्वात लोकप्रिय शो कौन बनेगा करोड़पति लवकरच आपल्या 11व्या सीझन बरोबर परत येणार आहे. या शोचे होस्ट आणि बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चनाने सोशल मीडियावर याबद्दल माहिती दिली. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर ट्विट केले, 'आदर आदाब अभिनंदन आभार !  मैं अमिताभ बच्चन प्रस्तुत करने जा रहा हूं, इस वर्ष 2019 का नया अभियान... कौन बनेगा करोड़पति... KBC !! बहुत जल्द आपके घरों में!!' 
प्रेक्षकांना हा ट्विट फार आवडत आहे. सध्या या गोष्टीचा उघड झाला नाही की केबीसी सीझन 11 ची नोंदणी कधीपासून सुरू होईल? कौन बनेगा करोड़पति सीझन 10 मध्ये फक्त 15 दिवसांत 31 दशलक्ष नोंदणी करवून सर्व मागील रेकॉर्ड तोडले होते. सन 2000 मध्ये सुरू झालेला हा गेम शो आजही प्रेक्षकांचा आवडीचा शो बनलेला आहे. 
 
केबीसीचे सर्व सीझन हिट राहिले. अमिताभ बच्चन व्यतिरिक्त शाहरुख खाननेही हा कार्यक्रम होस्ट केला आहे.