1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: जयपूर , सोमवार, 28 जानेवारी 2019 (11:12 IST)

'नारीशक्ती' शब्द वर्ड ऑफ द इयर, ऑक्सफर्डची घोषणा

बर्‍याच मंथनानंतर 'नारीश्रती' या शब्दाचा ऑक्सफर्ड डिक्शनरीत समावेश करण्यात आला आहे. ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या मते हा शब्द संस्कृतधून घेण्यात आला आहे. 
 
आपल्या मनाप्रमाणे जीवन जगणार्‍या महिलांच्याबाबतीत हा शब्द वापरला जातो. महिलांचे अधिकार आणि प्रत्येक क्षेत्रातील त्यांच्या प्रतिनिधीत्वासंदर्भात 'नारीशक्ती' या हिंदी शब्दाचा उपयोग केला जातो. महिला सशक्तीकरणासाठी सरकारने केलेले प्रयत्न आणि मीटू आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या शब्दाचा डिक्शनरीत समावेश करण्यात आल्याचे ऑक्सफर्डकडून सांगण्यात आले. या आधी ऑक्सफर्डने 2017 मध्ये 'आधार' या शब्दाचा डिक्शनरीत समावेश केला होता.
 
भारतात गेल्यावर्षी महिलांच्या अधिकाराबाबत मोठी जनजागृती झाली होती. भारतात मार्च 2018 मध्ये 'नारीशक्ती' या शब्दावर सर्वाधिक जोर देण्यात आला होता. त्याचवेळी केंद्र सरकारने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 'नारीशक्ती' पुरस्कार देण्याची घोषणा केली होती, याकडेही ऑक्सफर्डने लक्ष वेधले आहे.