नवरीच्या कौमार्य चाचणीवर महाराष्ट्र सरकारचे मोठे पाऊल
महाराष्ट्र सरकारने की कोणत्याही महिलेला कौमार्य चाचणीसाठी बाध्य करणे लवकरच दंडनीय गुन्हा असेल. राज्याच्या काही समुदायांमध्ये असली परंपरा आहे. यात नवरीमुलीला लग्नापूर्वी व्हर्जिन असल्याचे सिद्ध करावं लागतं.
गृह राज्यमंत्री रंजीत पाटिल यांनी या मुद्द्यावर काही सामाजिक संगघनांच्या एका प्रतिनिधिमंडळाशी भेट घेतली. शिवसेना प्रवक्ता नीलम गोरहे देखील या प्रतिनिधिमंडळाचा भाग होती.
पाटिल यांनी यावर म्हटले की कौमार्य चाचणीला यौन हल्ल्याचा प्रकार समजलं जाईल.... कायदा व न्याय विभागासह सल्ला घेऊन एक परिपत्रक जारी केले जाईल, ज्यात याला दंडनीय गुन्हा घोषित केले जाईल.
प्रतिष्ठेला धक्का पोहोचविणारी ही परंपरा कंजरभाट भाट आणि इतर काही समुदायात असून या समुदायातील काही तरुणांनी याविरुद्ध ऑनलाइन मोहिम सुरू केली आहे. या दरम्यान, पाटिल यांनी म्हटले की त्याचा विभाग प्रत्येक दोन महिन्यात यौन हल्ल्याचे प्रकरणांची समीक्षा करेल आणि कोर्टात असे प्रकरण लांबू नये याची काळजी घेईल.