मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 मार्च 2019 (16:55 IST)

देशी गर्ल ने शेअर केला वहिनीचा फोटो

देसी गर्ल आणि पिग्गी चॉप्स अभिनेत्री प्रियंका चोप्रा आपला पती निक जोनाससह सध्या भारतात आलीय. लग्रानंतर पहिल्यांदाच दोघं भारतात आले आहेत. दोघांचं भारतात परतण्यामागेही एक खास आणि तितकंच विशेष कारण आहे. प्रियंका आपला भाऊ सिद्धार्थच्या विवाह सोहळ्यासाठी भारतात आली आहे. नुकताच सिद्धार्थचा रोका कार्यक्रम पार पडला. सोशल मीडियावरून प्रियंकाने भाऊ सिद्धार्थ चोप्रा आणि वहिनीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत प्रियंकाने आपल्या लाडक्या होणार्‍या वहिनीचे स्वागत केले आहे. या दोघांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी पिग्गी चॉप्सने शुभेच्छाही दिल्या आहेत. सिद्धार्थ आणि इशिता गेल्या अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. अनेक वेळा इशिता प्रियंकाच्या कुटुंबीयांसोबत पाहायला मिळाली आहे. आता सिद्धार्थ लग्नबंधनात अडकणार आहे. त्यासाठीत लग्रानंतर जवळपास तीन महिन्यानंतर प्रियंका आणि नीक भारतात आले आहेत. रोका कार्यक्रातील पती निकसोबतचे फोटोसुद्धा प्रियंकाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 'द स्काय इज पिंक' या चित्रपटातून प्रियंका लग्रानंतर रुपेरीपडावर कमबॅक करणार आहे.