रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 जानेवारी 2019 (11:21 IST)

ऋतिक रोशनच्या बर्थडे वर Ex-वाइफ सुजैनने लिहिला हा इमोशनल मेसेज, शेयर केले PHOTO

बॉलीवूड हंक ऋतिक रोशनच्या 45व्या वाढदिवसाबद्दल त्याचे चाहते त्याला विश करत आहे. सर्वांनी ऋतिकसाठी प्रेमळ आणि चांगले मेसेज लिहिले आहे. पण या सर्वांमध्ये सर्वात जास्त चर्चा होत आहे ऋतिक रोशनची एक्स वाइफ सुजेन खानची. जिने ऋतिक आणि मुलांसोबत काही फोटोज शेयर करत एक इमोशनल पोस्ट लिहिली आहे. या  पोस्टामध्ये सुजैन ने ऋतिकला आपले सोलमेट सांगितले आहे.  
 
सुजैनने लिहिले - 'माझा सर्वात चांगला मित्र...'
सुजैन खानने आपल्या पोस्टामध्ये ऋतिक रोशन नेहमी तिचा चांगला आणि जीवलग मित्र आहे. तिने आपल्या पोस्ट मध्ये लिहिले - जगातील माझा सर्वात चांगल्या मित्राला वाढदिवसाच्या फार फार शुभेच्छा. सुजेन खानच्या पोस्टाला तिचे आणि ऋतिक रोशनचे चाहते पसंत आणि लाइक देखील करत आहे.  
 
14 वर्षांच्या लग्नानंतर झाला होता तलाक...
ऋतिक रोशन आणि सुजेन खानने वर्ष 2000 मध्ये लग्न केले होते. पण काही काळात त्यांच्यात दुरावा येऊ लागला. शेवटी वर्ष 2014मध्ये त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि घटस्फोट घेतला. सांगण्यात येत आहे की ऋतिक रोशन आणि सुजेन खान यांच्या घटस्फोट घेण्याचे एक मुख्य कारण अर्जुन रामपाल देखील होता. ज्याच्यासोबत सुजैनचे नाव जोडण्यात येत होते. नंतर अर्जुन देखील त्याची बायको मेहरहून वेगळा झाला होता.  
 
परत जवळ आले ऋतिक-सुजेन...
तलाक घेतल्यानंतर काही वेळेतच ऋतिक रोशन आणि सुजेन खान परत जवळ आले आणि नेहमी दोघेही डिनर डेट आणि पार्टीजमध्ये दिसू लागले. त्याशिवाय दोघेही आपल्या मुलांसोबत सुट्या घालवताना दिसू लागले. काही दिवसांअगोदर असे ही वृत्त आले की ऋतिक रोशन आणि सुजेन खान परत लग्न करू शकतात. पण सध्या दोघांनी याबद्दल काहीच सांगण्यास नकार दिला आहे.