मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' टाइटल ट्रॅक रिलीज

अभिनेता अनिल कपूर, कन्या सोनम कपूर आणि राजकुमार राव यांच्या चित्रपट 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा'चा पहिलं गाणं रिलीज झालं आहे. चित्रपटाचा हे टाइटल ट्रॅक 1994 मध्ये अनिल कपूरच्या चित्रपट '1942: ए लव स्टोरी' याच्या एका गाण्याला रिक्रिएट केले गेले आहे. 
 
सोनम कपूर आणि राजकुमार राव यांची रोमँटिक केमिस्टी या गाण्यात दिसून येत आहे. गुरप्रीत सैनी यांनी हे गीत लिहिले आहे, दुसरीकडे दर्शन रावल आणि रोचक कोहली यांनी अतिशय सुंदर आवाजात हे गीत गायले आहे. सोनम कपूरने
देखील आपल्या इंस्टाग्राम खात्यावर हे शेअर केले आहे. दर्शकांना हे गाणं इतके आवडले आहे की ते सोशल मीडियावर टॉप ट्रेडमध्ये चालत आहे. 
 
'एक लडकी को देखा तो ऐसा लगा'च्या या टाइटल ट्रॅकला लाखो लोक यूट्यूबवर बघून चुकले आहे. टायटल सॉन्ग बरोबर निर्मात्यांनी चित्रपटाचा नवीन पोस्टर देखील रिलीज केला आहे. पोस्टरमध्ये राजकुमार आणि सोनम एकत्र दिसत आहे. विशेष गोष्ट म्हणजे निर्मात्यांनी पोस्टरला उलटून रिलीज केले आहे.
 
काही दिवसापूर्वीच रिलीज झालेल्या ट्रेलर प्रेक्षकांना खूप आवडला आहे. हा चित्रपट 1 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात जूही चावला देखील दिसणार आहे. हा चित्रपट शैली चोप्रा दिग्दर्शित आणि विधु विनोद चोप्रा निर्मित आहे.