बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : सोमवार, 4 मार्च 2019 (16:43 IST)

'किंग जे. डी' झाला आता 'श्रेयाश्री' (बघा फोटो)

मराठी मधील पहिला रॅपर असे बिरुद मिळवलेला 'किंग जे. डी' उर्फ श्रेयश जाधव ह्याने नुकतीच भाग्यश्री सोमवंशी सोबत लग्नगाठ बांधली आहे. खुद्द श्रेयशने त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेयर करून ही माहिती दिली आहे.

मुंबईत पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक नामचीन मंडळींनी हजेरी लावून वधूवरास आशीर्वाद दिले. सोशल मीडियावरून देखील या नवीन उभयतांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. श्रेयसने शेयर केलेल्या फोटो वरून हा लग्न सोहळा किती राजशाही आणि  भव्य असेल याचा अंदाज येत आहे. २०१९ हे वर्ष श्रेयशसाठी नक्कीच संस्मरणीय ठरले आहे.

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या आणि  'मी पण सचिन' या चित्रपटाद्वारे श्रेयसने लेखनात आणि दिग्दर्शनात यशस्वी पाऊल ठेवले आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.