शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 मार्च 2019 (15:42 IST)

सॅमसंग गॅलॅक्सी फोल्डनंतर दोन नवीन फोल्डेबल फोनवर कार्यरत आहे

अलीकडेच सॅमसंगने आपला फोल्डेबल स्मार्टफोन Galaxy Fold (गॅलॅक्सी फोल्ड) लॉन्च केला होता. आता सॅमसंग त्याच्या दोन नवीन फोल्डेबल स्मार्टफोनवर कार्यरत आहे. ताज्या माहितीनुसार, दोन्ही फोल्डेबल फोन एकमेकांपेक्षा वेगळे असतील. हे सॅमसंग गॅलॅक्सी फोल्डसारखे आतल्या बाजूला फोल्ड होणार नाही. 
 
यापैकी पहिला फोन वरून खालच्या बाजूला उघडेल. दुसरीकडे, इतर मॉडेल आतून बाहेरच्या बाजूला उघडेल. बाहेरच्या बाजूस उघडणार्‍या डिझाइनच्या प्रोटोटाइपला हुवावेच्या मेट एक्स आणि शाओमीच्या जारी केलेल्या व्हिडिओत आपण पाहिले आहे. या फोनच्या लॉन्चबद्दल सध्या कंपनीने कोणतीही टाइमलाइन निश्चित केली नाही आहे. सॅमसंग सध्या या डिव्हाईसचे फोल्डेबल डिझाइनसह प्रयोग करीत आहे. 
 
अशामध्ये हे गृहीत धरले जाऊ शकते की या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला हे बाजारात येतील. सॅमसंग गॅलॅक्सी फोल्डमध्ये दोन डिस्प्ले आहे. एक बाहेरच्या आणि इतर आतील बाजूस. फोल्ड केल्यावर हे स्मार्टफोनसारखे कार्य करते आणि अनफोल्ड झाल्यावर हे टॅबलेटसारखे दिसते. कंपनीने यास 1,980 डॉलरमध्ये आणले आहे, म्हणजे सुमारे 1,41,500 रुपये. हा फोल्डेबल फोन 26 एप्रिलपासून विक्रीसाठी येईल.