शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

TECNO CAMON iSKY 3 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

TECNO CAMON iSKY 3 भारतात लाँच केला गेला. अँड्रॉइड 9 पाई (Android 9 Pie) वर आधारित TECNO CAMON iSKY 3 ची भारतात किंमत 8599 रुपये आहे. यात क्वाड-कोर प्रोसेसरसह 2 जीबी रॅम आहे.

स्टोरेजसाठी कंपनीने यात 32 जीबी इंटर्नल मेमरी दिली आहे. मायक्रो एसडी कार्डच्या साहाय्याने स्टोरेज वाढविणे शक्य आहे. या व्यतिरिक्त यात 6.2 इंची एचडी + स्क्रीन आहे ज्याचे आस्पेक्ट रेसिओ 19:9 आहे.
 
3,500 एमएचएच बॅटरी दिली आहे. TECNO CAMON iSKY 3 मध्ये दोन रिअर कॅमेरा दिले आहे. फोनच्या मागच्या बाजूस 13 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सेलचा सेकेंडरी सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये एआय फेस अनलॉक आणि मागील पॅनेलवर फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल. 
 
कंपनीच्या मते, TECNO CAMON iSKY 3 वन-टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट, 100 दिवस विनामूल्य बदली आणि एक महिन्याच्या विस्तारित वॉरंटीसह येईल. स्मार्टफोन मिडनाइट ब्लॅक, एक्वा ब्लु, शेंपेन गोल्ड आणि नेब्युला ब्लॅक रंगात मिळेल.