बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 19 मार्च 2019 (18:08 IST)

WhatsApp चे इन-अॅप ब्राउझर फीचर्स, या व्यतिरिक्त एक आणखी फीचर करेल धमाल

व्हाट्सअॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी नवीन-नवीन फीचर्स आणत असतो. अशात व्हाट्सअॅप एक नवीन फीचर सादर करणार आहे, ज्याचे नाव इन-अॅप ब्राउझर असे आहे. या नवीन फीचरमुळे वापरकर्ते अॅपच्या आतच कोणत्याही लिंकला उघडू शकतील. 
 
या विलक्षण फीचरद्वारे व्हाट्सअॅप वापरकर्त्यांना एक चांगली सुविधा प्रदान करणार आहे. यात वापरकर्ता कोणताही वेब पेज व्हाट्सअॅपच्या आतच उघडण्यास सक्षम होतील. वेब पेज उघडण्यासाठी त्यांना अॅपमधून बाहेर जाण्याची आवश्यकता नसेल. तथापि, हे देखील समोर येत आहे की हा फीचर वापरताना आपण कोणताही स्क्रीनशॉट किंवा स्क्रीन रेकॉर्ड करू शकणार नाही. 
 
या इन-अॅप ब्राउझरबद्दल विशिष्ट गोष्ट म्हणजे वापरकर्त्यांसाठी हानिकारक असलेल्या वेब पेजबद्दल हे अलर्ट देखील देईल. या व्यतिरिक्त जर आपण चिंताग्रस्त आहात की कुठे कोणी आपल्या व्हाट्सअॅप किंवा फेसबुक ब्राउझिंग इतिहास तपासत तर नाहीये, तर आपल्याला काळजी करण्याची गरज नाही आहे कारण की कोणीही आपली हिस्ट्री तपासू शकणार नाही. 
 
या फीचर व्यतिरिक्त कंपनी रिव्हर्स इमेज सर्च फीचर देखील तपासत आहे. हे फीचर आपल्याला रिसीव्ह इमेज गुगलवर अपलोड करण्यामुळे तपासण्याची संधी देईल. याने कळून येईल की हे वेबवर आधी दिसले आहे वा नाही. आपल्याला मिळालेली इमेज वास्तविक वा फेक हे कळून येईल. 
 
व्हाट्सअॅपमध्ये रिसीव्ह इमेज सर्च फीचर भारतासारख्या देशासाठी खूप कामाचा फीचर असू शकतो कारण की येथे सतत फेक न्यूज शेअर केली जात असते. बऱ्याच लोकांद्वारे व्हाट्सअॅपचा दुरुपयोग होत आहे. हे दोन्ही फीचर सध्या फक्त व्हाट्सअॅप अँड्रॉइड बीटा अॅपवर पाहिले गेले आहे. ते कधी लॉन्च केले जातील, याबद्दलची माहिती सध्या उघडकीस आलेली नाही.