मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 18 मार्च 2019 (12:01 IST)

आता आवडते गाणे फेसबुकवर शेअर करू शकता

बऱ्याचदा आपण एक गाणे ऐकत असता किंवा आपल्याला एखादं गाणं खूप आवडत. तेव्हा आपल्याला असे वाटते की याबद्दल सोशल मिडियावर पोस्ट करून मित्रांना सांगा किंवा आपल्या कोणत्याही व्हिडिओसह शेअर करा. या फीचरसाठी फेसबुकने बऱ्याचं भारतीय संगीत कंपन्यांशी करार केला आहे.
 
फेसबुकने ही माहिती दिली. कंपनीने टी-सिरींज म्युझिक, जी म्युझिक आणि यशराज फिल्म्ससह इतर अनेक भारतीय संगीत कंपन्यांशी करार केला आहे. यामुळे वापरकर्त्यांना फेसबुकवर आपल्या पोस्ट किंवा व्हिडिओसह संगीत शेअर करण्याची संधी मिळेल. इंस्टाग्रामवर देखील लोकांना ही सुविधा मिळेल. आता भारतीय वापरकर्ते हजारो परवानाकृत भारतीय संगीताला फेसबुकवर आपल्या पोस्ट्स आणि व्हिडिओसह शेअर करू शकतात. यामुळे त्यांना त्यांचे पोस्ट अधिक अर्थपूर्ण आणि खाजगी बनविण्यात मदत होईल. ही भागीदारी करण्यापूर्वी अशा गाण्यांचा वापर करून तयार केलेले पोस्ट किंवा व्हिडिओला फेसबुक कॉपीराइट प्रकरणांमुळे काढून टाकायचा. 
 
फेसबुकच्या भारतीय व्यवसायाचे संचालक आणि भागीदारी प्रमुख मनीष चोप्रा म्हणाले की आम्ही भारताच्या संगीत उद्योगाबरोबर भागीदारीबद्दल खूप उत्साहित आहोत. याची कल्पना नुसती योडी आहे की भारतात फेसबुक आणि इंस्टाग्रामवर लोक आपल्या व्हिडिओमध्ये संगीत सामील करण्यास देखील सक्षम होतील. हे मित्र आणि कौटुंबिक सदस्यांसह आठवणी शेअर आणि व्यक्त करण्यासाठी इतर अनेक पर्याय देईल. या भागीदारीनंतर लोक त्यांच्या व्हिडिओमध्ये 'गली बॉय' च्या ‘अपना टाइम आएगा’यासारख्या नवीन गाण्यांपासून तर बऱ्याच जुन्या आणि प्रादेशिक गाणी देखील शेअर करू शकतील.