शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 14 मार्च 2019 (16:31 IST)

Facebook बनवत आहे माइंड रीडिंग मशीन

सोशल नेटवर्किंग साईट फेसबुक माइंड रीडिंग मशीन तयार करत आहे, जे वापरकर्त्याच्या मनात काय सुरू आहे हे जाणून घेईल. फेसबुकचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झकरबर्गने हावर्ड युनिव्हर्सिटीच प्राध्यापक जॉनथन जिटरेन यांना दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली आहे. झकरबर्ग यांनी सांगितले की फेसबुक एका 'ब्रेन-कम्प्यूटर इंटरफेस' वर शोध करत आहे. तथापि त्यांनी यावर देखील जोर दिला की प्रत्येकजण या तंत्राचा वापर करू शकणार नाही. वापर करण्यापूर्वी वापरकर्त्याची संमती दाखल करणे आवश्यक आहे.
 
* ऑग्युमेन्टेड रिऍलिटीसाठी उपयुक्त आहे - जवळच्या भविष्यात, ब्रेन कंप्यूटर इंटरफेस सिस्टम ऑग्युमेन्टेड रीयलटी एनवायरमेंटमध्ये उपयोगी सिद्ध होईल. लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे यासाठी कीबोर्ड, टचस्क्रीन किंवा हॅंड जेश्चरची आवश्यकता नसेल. वापरकर्त्यास केवळ त्याबद्दल विचार करण्याची आवश्यकता आहे आणि हे घडेल. उदाहरणार्थ जसे समोर ठेवलेली चेअर तेथून सरकून जाईल, तर ऑग्युमेन्टेड रीयलटी एनवायरमेंटमध्ये ती सरकून जाईल. झकरबर्गच्या मते, ही कल्पना फेसबुक वापरकर्तांना एआर जगाला स्पर्श न करता मेनू चालवण्यात आणि ऑबजेक्ट काढून टाकण्यास मदत करेल. इतकेच नव्हे तर वापरकर्ते काहीही न करता विचार टाइप करण्यास सक्षम असतील.
 
* कॅप सारखा डिव्हाईस - हे डिव्हाईस व्हर्च्युअल हँडसेटसारखे नसणार, ज्यामध्ये डोळे लपतात. फेसबुकची ही प्रणाली एका कॅपसारखीच असेल, जे ब्लड प्रेशर, मेंदू कार्य आणि त्याच्या विचारांना पकडेल. झुकरबर्गच्या मते, हे व्यक्तीसाठी तंत्रज्ञान अधिक सुधारण्यात मदत करेल. झुकरबर्ग यांनी आपल्या मुलाखतीत असे सांगितले की सध्याच्या काळात फोन किंवा इतर कम्प्यूटर सिस्टम ज्या प्रणालीवर कार्यरत आहे, त्यांच्या आधारावर अॅप आणि त्यांचे कार्य निश्चित असतात. ते म्हणाले की, हे आपल्या मेंदूच्या किंवा आपल्या इच्छेप्रमाणे कार्य करत नाही. हेच एक कारण आहे की तंत्रज्ञानाच्या कुशल वापरासाठी एक नवीन तंत्रज्ञान तयार करत आहोत. एआर सारख्या प्रकरणांमध्ये, हे डिव्हाईस आपल्याला सर्वकाही करण्याची परवानगी देईल, जसे आपण विचार करता.
 
* डिव्हाईसवर काही निर्बंध देखील असतील - झुकरबर्ग यांनी या प्रणालीबद्दल सांगितले की त्याचा जास्त विस्तार होणार नाही कारण की हे प्रतिबंधित उपकरण असू शकते. सन 2017 मध्ये झुकरबर्गने चॅन झुकरबर्ग बायोहबसाठी पाच कोटी डॉलर्स दिले होते जेणेकरून ते माइंड रीडिंग मशीनला शरीरात ठेवून तपासणी करू शकेल.
 
- झुकरबर्गच्या मते, एक मिनिटांत मानवी मेंदू 04 एचडी सिनेमाबरोबरचा डेटा काढतो.