गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

रेडमी नोट 7 प्रो ची पहिली सेल आज, यात आहे 48MP कॅमेरा

चायनीज स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने मागील महिन्यात भारतात रेडमी नोट 7 आणि रेडमी नोट 7 प्रो लॉन्च केले होते. यातून रेडमी नोट 7 प्रो (Redmi note 7 pro) मध्ये कंपनीने 48 मेगापिक्सल रियर कॅमेरा दिला आहे, तसेच यापूर्वी चीनमध्ये रेडमी नोट 7 ला 48 मेगापिक्सल कॅमेर्‍यासह प्रस्तुत केले गेले होते. रेडमी नोट 7 ची विक्री आधीपासून भारतात होत आहे परंतू Redmi note 7 pro ची पहिली सेल आज आहे. रेडमी नोट 7 प्रो 13 मार्च दुपारी 12 वाजता शाओमी स्टोअर, एमआई डॉट कॉम आणि फ्लिपकार्टहून खरेदी करता येईल.
 
स्पेसिफिकेशन
रेडमी नोट 7 प्रो स्पेसिफिकेशन बघायला गेलो तर यात 6.3 इंच फुल एचडी प्लस वाटरड्रॉप नॉच डिस्प्ले आहे ज्याचा आस्पेक्ट रेशियो 19.5:9 आहे. डिस्प्लेवर गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आहे. फोनच्या प्रोसेसरबद्दल सांगायचे तर यात क्वॉलकॉमचे ऑक्टाकोर स्नॉपड्रॅगन 675 प्रोसेसर आहे आणि हे फोन 4GB/6GB रॅम आणि 64GB/128GB च्या स्टोरेज वेरियंटमध्ये मिळेल, तसेच स्टोरेजला मेमरी कार्डच्या मदतीने 256 जीबी पर्यंत वाढता येऊ शकतं. 
 
कॅमेरा
या फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यात एक कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे आणि याचा अपर्चर f/1.79 आहे तसेच दुसरा कॅमेरा 5 मेगापिक्सलचा आहे. कॅमेर्‍यासह एआईचा सपोर्ट देखील मिळेल. तसेच या फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. सोबतच हा फोन 4के व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो.
 
बॅटरी आणि कनेक्टिविटी
फोनमध्ये 4000mAh ची बॅटरी आहे जी क्विक चार्ज 4.0 ला सपोर्ट करते. फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर, सी-टाईप चार्जिंग पोर्ट, 3.5एमएम हेडफोन जॅक, डुअल सिम सपोर्ट, वाई-फाई, ब्लूटूथ 5.0 सारखे फीचर्स आहे. फोनसोबतच 18 वॉटचे चार्जर देखील मिळेल.
 
किंमत
रेडमी नोट 7 प्रो च्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज वेरियंटची किंमत 13,999 रुपये आणि 6 जीबी रॅम यासह 128 जीबी स्टोरेज वेरियंटची किंमत 16,999 रुपये आहे. हा फोन नेप्च्यून ब्ल्यू, नीबूला ब्ल्यू, नीबूला रेड आणि स्पेस ब्लॅक कलर वेरियंटमध्ये मिळेल. फोनसोबत एअरटेलकडून 1220 जीबी डेटा आणि अनलिमिडेट कॉलिंग मिळेल.