गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 5 फेब्रुवारी 2019 (14:50 IST)

'या' दमदार फीचर्ससह येतोय वनप्लस 7

चीनमधील प्रिमिअम स्मार्टफोनची निर्मिती करणारी वनप्लस ही कंपनी या वर्षी वनप्लस.7 हा स्मार्टफोन लाँच करणार आहे. 5-जी स्मार्टफोन असणार आहे. यात नवीन फीचर्स असतील. स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसरसह स्मार्टफोन लाँच केला जाईल.
 
यावर्षी लाँच होणार्‍या बहुतांश फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर असेल. वनप्लस 7 मध्ये पाच नवे फीचर्स असू शकतात. वनप्लस 6 आणि वनप्लस 6टी या फोनमध्ये नॉच देण्यात आले होते. मात्र, वनप्लस7 मध्ये नॉच नसेल. या फोनमध्ये स्लायडर फ्रंट कॅमेरा असू शकतो. पॉप अ‍ॅप सेल्फी कॅमेराही असेल, असे सांगितले जाते.

वनप्लस 7 मध्ये नेटफ्लिक्सला एचडीआर सपोर्टही असेल. त्यामुळे ग्राहकांना ऑनलाइन स्ट्रीमिंग अधिक चांगल्यारीतीने अनुभवता येईल. फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी 'वार्प चार्ज.30' मुळे फोन खूपच वेगाने चार्ज होईल. या वर्षी लाँच होणार्‍या सर्व स्मार्टफोनचे हे स्टँडर्ड फीचर असेल, असा दावा कंपनीने केला आहे.