2018 मधील व्हाट्सअॅपचे सर्वात उपयुक्त वैशिष्ट्ये
व्हाट्सअॅपसाठी 2018 हा एक महत्त्वाचा वर्ष राहिला. रुचिपूर्ण आणि उपयुक्त वैशिष्ट्यांच्या प्रारुपापासून तर खोट्या माहितीविरुद्ध कारवाई करण्यापर्यंत या वर्षी व्हाट्सअॅपने वापरकर्त्यांना अनेक सुविधा उपलब्ध करवल्या. 220 दशलक्ष वापरकर्त्यांसह, जागतिक स्तरावर सध्या भारत व्हाट्सअॅपसाठी सर्वात मोठा बाजार आहे. व्हाट्सअॅपने 2018 मधील व्हाट्सअॅपचे सर्वात उपयुक्त वैशिष्ट्ये जाणून घ्या:
1. ग्रुप व्हिडिओ आणि व्हॉईस कॉलिंग - व्हाट्सअॅप ग्रुप कॉलिंग 2018 मध्ये व्हाट्सअॅपद्वारे सादर केलेल्या सर्वात मोठ्या नवीन वैशिष्ट्यांपैकी एक आहे. वैशिष्ट्य ऑगस्टमध्ये सुरू झालं. कंपनीने सहभागीदारांना कॉलमध्ये जोडणे सोपे करून डिसेंबरमध्ये ग्रुप कॉलिंग फीचरमध्ये सुधार केला. व्हाट्सअॅप ग्रुप कॉलिंग सध्या केवळ चार लोकांना जोडण्यात सक्षम आहे.
2. व्हाट्सअॅप स्टिकर्स - व्हाट्सअॅपने ऑक्टोबरमध्ये त्याच्या व्यासपीठावर स्टिकर्स जोडले. अॅप वापरकर्त्यांना काही डिफॉल्ट स्टिकर्स प्रदान करते आणि कंपनीच्या स्टिकर्स स्टोअर मधून अधिक डाउनलोड केले जाऊ शकतात.
3. व्हाट्सअॅप पेमेंट्स - व्हाट्सअॅप पेमेंट्स हा भारतीय वापरकर्त्यांसाठी कंपनीचा सर्वात मोठे नवीन वैशिष्ट्य होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सर्व पेमेंट उघडण्यासाठी कंपनी अद्याप अधिकृत मंजुरीची वाट पाहत आहे. युनायटेड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) वर आधारीत, व्हाट्सअॅप पेमेंट्स वापरकर्त्यांना पैसे पाठविण्यास, विनंती करण्यास आणि हस्तांतरित करण्यास परवानगी देतो.
4. पिक्चर-इन-पिक्चर सपोर्ट - व्हाट्सअॅप वापरकर्त्यांना अनुप्रयोगाच्या इतर भाग ब्राउझ करताना एका लहान विंडोमध्ये फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा यूट्यूब व्हिडिओ पाहणे सुरू ठेवण्यास अनुमती देतं. आयफोन वापरकर्त्यांना या वैशिष्ट्याचा वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारीमध्ये आणि अँड्रॉइड वापरकर्त्यांना डिसेंबरमध्ये लाभ मिळाला. आधी उल्लेख केलेल्या तीन व्हिडिओ सामायिकरण सेवेव्यतिरिक्त, पीआयपी कोणत्याही अन्य व्हिडिओ सामायिकरण सेवेसाठी किंवा अॅपमध्ये मूळरीत्या सामायिक केलेल्या व्हिडिओसाठी उपलब्ध नाही.
5. ग्रुप चॅट्स - व्हाट्सअॅप ग्रुप्स यांना या वर्षी अनेक नवीन वैशिष्ट्ये मिळाले आणि ते देखील अॅडमिन्ससाठी अधिक नियंत्रणांसह. नावेव्यतिरिक्त, ग्रुप्समध्ये आता वर्णन देखील असू शकेल.
6. मीडिया व्हिजिबिलिटी - जूनमध्ये अॅपने अँड्रॉइड वापरकर्त्यांना विशिष्ट चॅट्स किंवा ग्रुप्समधून मीडियाला त्यांच्या मीडिया लायब्ररीमध्ये दिसण्याची इच्छा आहे किंवा नाही हे निवडायचा विकल्प देखील दिला.
7. फॉरवर्डिंग रिस्ट्रीक्शंस आणि लेबल्ड फॉरवर्डेड मेसेजेज - नकली बातम्या पसरविणे थांबविण्यासाठी व्हाट्सअॅपने संदेश फॉरवर्डिंगवर कठोर प्रतिबंध ठेवले. जुलै महिन्यात कंपनीने जाहीर केले की ते मीडिया संदेशांमधून त्वरित फॉरवर्ड बटण काढून टाकतील. याव्यतिरिक्त, अॅपने इतर वापरकर्त्यांद्वारे फॉरवर्ड केलेल्या कोणत्याही संदेशांपुढे 'फॉरवर्डेड' लेबल दर्शविणे प्रारंभ केले आहे.
8. व्हाट्सअॅप डेटा डाउनलोड - ईयू डेटा प्राइव्हसी गाइडलाईंस पूर्ण करण्यासाठी, व्हाट्सअॅपने वापरकर्त्यांना प्लॅटफॉर्मवर घेतलेले सर्व डेटा डाउनलोड करण्याची क्षमता ऑफर करण्यास प्रारंभ केली आहे. हे वैशिष्ट्य मे मध्ये लॉन्च झालं.