व्हॉट्सअॅपवर ग्रुप कॉलिंगची लाईव्ह सुरु
व्हॉट्सअॅपने आजपासून जगभरात वॉईस आणि व्हिडिओ सपोर्टसह ग्रुप कॉलिंगची लाईव्ह झालं आहे. अँड्रॉईड आणि iOS दोन्ही युजर्स याचा वापर करु शकणार आहेत. WhatsApp चं ग्रुप कॉलिंग फीचर एका वेळेला चार लोकांना सपोर्ट करतो. हे चार लोकं कुठेही असले तरी याचा वापर करता येणार आहे.
WhatsApp च्या या नव्या फीचरमुळे यूजर्स जास्तीत जास्त 4 जणांना व्हिडिओ किंवा वॉईस कॉल एकावेळी करु शकता. व्हॉट्सअॅप यूजर्सला कंपनीने विश्वास दिला आहे की, त्यांचे सर्व मॅसेज आणि ग्रुप कॉल एंड-टू इनक्रिप्टेड आहे. त्यामुळे प्रायव्हसी बाबतीत जे लोकं चिंतीत आहे त्यांना आता टेन्शन घेण्याचं कारण नाही.
हे नवं फीचर WhatsApp च्या iOS आणि अँड्रॉईड व्हर्जनसाठी उपलब्ध आहे. 2016 मध्ये व्हिडिओ कॉलिंगची सुविधा सुरु करण्यात आली होती. तर 2014 मध्ये व्हॉट्सअॅप वॉईस कॉलिंग सुविधा सुरु झाली होती.