गुरूवार, 4 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 31 जुलै 2018 (09:10 IST)

म्हातार चळ, ‘६३’वर्षाच्या थोराड माणसाची ५ प्रियसीसाठी चोरी

The old man
नाव बंधू सिंहआणि वय ‘६३’असलेल्या थोराड माणसाला एक दोन नव्हे तर चक्क पाच प्रेयसी आहेत. त्यांना खूष करण्यासाठी पैशांची गरज होती, म्हणून त्याने चोरीचा मार्ग स्विकारला. पण त्यातच तो अडकला आणि चोरी करताना पोलिसांनी त्याला पकडले. २८ जून रोजी दिल्लीच्या सराय रोहिल्ला या औद्योगिक परिसरात एका कारखान्यात बंधू सिंग चोरीच्या उद्देशाने टेहळणी करत होता. पण कारख्यान्यातील सीसीटीव्हीत तो कैद झाला. सीसीटीव्हीतील फुटेज पाहून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आणि त्याच्याकडून दोन लॅपटॉप, एक एलईडी आणि ५ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.
 
पोलिसांनी तपास केल्यावर बंधू सिंग कडून चोरीचे अजबच कारण कळाले. बंधू सिंगच्या पाच प्रेयसी आहेत. त्यांच्यावर खर्च करण्यासाठी त्याने हा चोरीचा मार्ग स्विकारला. मुलींवर छाप पाडण्यासाठी महाशय आजही जिम मध्ये जातात, केसही काळे करतात. पोलिस मागील चार चोरीच्या प्रकरणात बंधू सिंग यांच्या शोधात होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहून आणि प्रत्यक्षदर्शीने खात्री पटवल्यावर पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले.