सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 13 डिसेंबर 2018 (09:01 IST)

व्हॉटसअॅपप्रमाणे इन्स्टाग्रामवर व्हॉइस मेसेज पाठवता येणार

व्हॉटसअॅपप्रमाणे इन्स्टाग्रामवर व्हॉइस मेसेज पाठवता येणार असून, अंड्रॉईड व अॅपल या दोन्ही युजर्ससाठी हे नवीन फिचर कार्यरत असणार आहे. ही सुविधा मिळण्यासाठी युजर्सना सर्वात आधी हे अॅप अपडेट करवून घ्यावे लागणार आहे. युझर ने  चॅट या पर्यायामध्ये युजर्सना आता एक माईकचे चिन्ह दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला व्हॉइस मेसेज करता येईल. तर व्हॉइस मेसेजमध्ये काही गडबड झाल्यास डावीकडे स्वाईप केल्यावर हा मेसेज रद्द करता येणार आहे.
 
यातील आणखी एक विशेष बाब अशी की, आपल्याकडून रेकॉर्ड करण्यात आलेला व्हॉइस मेसेज अनसेंड करायची सुविधाही देखील असणार आहे. यासाठी आपल्याकडून पाठवण्यात आलेला व्हॉइस मेसेज दिर्घकाळासाठी प्रेस करुन ठेवायचा आहे. त्याठिकाणी अनसेंड हा पर्याय येईल आणि व्हॉइस मेसेज डिलीट करता येईल. इन्स्टाग्रामला आपली मिळकत वाढवायची असल्याने तसेच युजर्सची संख्या वाढवायची असल्याने कंपनीने हे नवे फिचर आणले असल्याचे सांगितले आहे. यामुळे लोक व्हॉटसअॅपवरुन इन्स्टाग्रामकडे वळावेत असेही कंपनीचे म्हणणे आहे.