सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

इन्स्टाग्राममध्ये आकर्षक बदल होणार

येत्या काही दिवसात इन्स्टाग्राममध्ये युजर्सना अनेक नवीन बदल पाहायला मिळणार आहेत. इन्स्टाग्राममध्ये प्रोफाइल, फीचर, आयकॉन्स आणि बटण अधिक आकर्षक करण्यात येणार आहे. या संदर्भात चाचणी सुरू असल्याची माहिती देण्यात आली असून या नव्या फिचर्सच्या मदतीने युजर्स आपल्या मित्रमैत्रिणींसोबत चांगल्या पद्धतीने कनेक्ट होणार आहेत.
 
 नवीन फीचर अॅड झाल्यानंतर फॉलो आणि मेसेजचं बटण बाजूबाजूला येणार आहे. तसेच आपण जेव्हा कोणाच्याही प्रोफाइलवर टॅप करू तेव्हा आपल्याला म्यूच्युअल फॉलोअर्स दिसणार आहेत. युजर्संना इन्स्टाग्रामचा वापर करणं अधिक सोयीचे व्हावे यासाठी प्रयत्न करत असल्याचं कंपनीने म्हटले आहे.