बीएसएनएल(BSNL)ने रक्षाबंधन सणानिमित्त ग्राहकांसाठी खुश खबर अनलिमिटेड व्हॉइस, डेटा
शेवटी सरकारी कंपनी बीएसएनएल(BSNL)ने रक्षाबंधन सणानिमित्त ग्राहकांसाठी खुश खबर आणली आहे. त्यात त्यांनी मोठ्या घोषणा केल्या असून एक विशेष ऑफर अंतर्गत बीएसएनएलने 'STV399' असा एक नवीन प्लॅन बाजारात आणला असून त्यानुसार ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉइस, डेटा आणि एसएमएस करण्याचा फायदा मिळणार आहे. या नवीन धमाकेदार प्लॅनची किंमत 399 रुपये असून प्रीपेड प्लॅनमध्ये 74 दिवसांची मर्यादा देण्यात आली आहे.
बीएसएनएलचा हा नवीन प्लॅन दिल्ली, मुंबई टेलिकॉम सर्कलमध्ये लागू केला आहे. ध्ये Personalized Ring Back Tone(PRBT) चा फायदा सुद्धा ग्राहकांना मिळणार असून, ग्राहकांना अनलिमिटेड साँग बदलण्यासाठी ऑप्शन मिळणार आहे. 'STV399' हा प्लॅन 26 ऑगस्ट म्हणजेच रक्षाबंधन या सणादिवशी ग्राहकांना उपलब्ध होईल. टेलिकॉमटॉकच्या वृत्तानुसार, बीएसएनएलच्या, या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि एसएमएस करण्याचा फायदा घेता येणार आहे. त्यामुळे जियो मुळे मागे पडलेल्या कंपनीला थोडा तरी फायदा होईल असे चिन्हे आहेत.