शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 13 जून 2018 (08:38 IST)

जिओकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर

जिओने पुन्हा एकदा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर आणली आहे. जिओने एक नवा प्लान आणला आहे. जिओच्या सगळ्या ग्राहकांना आता 1.5 जीबी डेटा अजून मिळणार आहे. जर जिओ यूजरने कोणाताही प्लान घेतला तर त्याच्यासोबत 1.5 जीबी डेटा म्हणजे एकून 3 जीबी डेटा दररोज मिळणार आहे. जिओने 149 रुपये, 349 रुपये, 399 रुपये आणि 449 रुपयांचा प्लान आणला आहे. आता 1.5 जीबी डेटा प्रतिदिनसह एकूण 3 जीबी डेटा रोज मिळणार आहे.
 
198 रुपये, 398 रुपये, 448 रुपये आणि 498 रुपयांच्या पॅकमध्ये आता एकूण 2 जीबी डेटा प्रतिदिन भेटतो आहे. पण नव्या ऑफरनुसार आणखी 1.5 जीबी डेटा मिळणार आहे. म्हणजे आता एकूण 3.5 जीबी डेटा मिळणार आहे. जिओच्या 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये 3 जीबी डेटा रोज मिळतो पण आता 1.5 जीबी अतिरिक्त डेटासह एकूण 4.5 जीबी डेटा रोज मिळणार आहे. 509 रुपयांच्या प्लॅनमध्ये 1.5 जीबी अतिरिक्त डेटासह 5.5 जीबी डेटा रोज मिळणार आहे. 799 रुपयांच्या प्लॅनमध्ये 5 जीबी डेटा प्रतिदिन मिळतो पण आता 6.5 जीबी डेटा रोज मिळणार आहे.
 
जिओने 300 रुपयांपेक्षा अधिकच्या रिचार्जवर 100 रुपयांची सूट देण्याची घोषणा केली आहे. 300 रुपयांच्या रिचार्जवर 20 टक्के सूट मिळणार आहे. जिओ अॅपमध्ये रिचार्ज केल्यावर देखील ही ऑफर  मिळेल.