शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: सोमवार, 11 जून 2018 (12:16 IST)

या हॉटेलातील ग्राहक खातात सोने

दुबईतील श्रीमंत शेख लोकांचा सोन्याचा हव्यास जगात परिचित आहे. त्यांचे सोनेप्रम नवे नसले तरी खाद्यपदार्थात त्याचा समावेश केला जात असेल याची आपल्याला कल्पना नाही. मात्र दुबईत आता अंगावर सोने घालण्याबरोबर ते खाण्याची क्रेझ वाढत चालली आहे. येथील प्रसिद्ध हॉटेल बुर्ज अल अरब मध्ये नव्याने सुरु झालेल्या रेस्टॉरंटमध्ये केक, कॉकटेल, कॅपेचीनो सारख्या पदार्थांत चक्क सोने वापरले जाते. या हॉटेलच्या 27 व्या मजल्यावर हे गोल्ड ओं 27 रेस्टॉरंट आहे.
 
या हॉटेलचे मॅनेजर खारो सांगतात, हॉटेलच्या सजावटीत शुद्ध सोन्याचा वापर केला गेला आहे तसेच पदार्थात त्याचा वापर केला जात आहे. सोन्याला चव नाही हे खरे असले तरी लग्झरी आयुष्य म्हणजे काय हे दाखविण्याची ती एक पद्धत आहे. दरवर्षी येथे 700 ग्रॅम सोने पदार्थात घालण्यासाठी वापरले जाते. येथील खास कॉकटेल एलिमेंट 79 मध्ये अल्कोहोल नाही मात्र वाईनमध्ये गोल्ड फ्लेक्स घातले जातात. त्यातील साखरेचे तुकडेही सोनेरी असतात. दरमहा किमान एक दोन ग्राहक सोने कव्हर असलेला केक नेतात तसेच कॅपीचीनोवर सोन्याचा थर दिला जातो.